शिल्पा शेट्टीनं कन्यांचे धुतले पाय, 9 मुलींना घेऊन असे केले कन्यापूजन, शेयर केला व्हिडिओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    आज 24 ऑक्टोबर नवरात्रीचा आठवा दिवस आहे. यास दुर्गाष्टमी सुद्धा म्हटले जाते. आज संपूर्ण देशात भाविक महागौरी मातेची पूजा करतात. यासोबतच अनेक ठिकाणी कन्यापूजन सुद्धा करण्यात आले. तर या निमित्ताने बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा भक्तीमय झाल्याचे दिसून आले. तिने आपल्या घरात कन्यापूजन केले. यावेळी तिने 9 कन्यांचे पूजन केले. यासोबतच शिल्पा शेट्टीने आपली मुलगी शमिशाचे सुद्धा खास पूजन केले. शिल्पाने आपल्या पूर्ण पूजेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेयर केला आहे.

https://www.instagram.com/theshilpashetty/?utm_source=ig_embed

शिल्पा शेट्टीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम देवीची मूर्ती आणि तिची सजावट दिसत आहे. यानंतर शिल्पा आपली मुलगी शमिशाचे चिमुकले पाय दाखवून त्यांची पूजा करताना दिसत आहे. याशिवाय शिल्पाने आणखी आठ कन्यांचे पाय धुतले आणि त्यांना जेऊ घातले, आरतीचे ताट सजवून या कन्यांची पूजा केली. शिल्पाच्या या व्हिडिओत तिची बहिण शमिता शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सुद्धा दिसत आहे.

हा व्हिडिओ शेयर करताना शिल्पाने लिहिले आहे – आज अष्टमीच्या पवित्र समयी, आम्हाला सौभाग्याने आशीर्वादाच्या रूपात आमची देवी शमिशा मिळाली होती. तिची पहिली नवरात्री आहे, यासाठी कन्यापूजन केले. तिच्यासोबत आणखी 8 छोट्या मुलींचे स्वागत केले सर्व खबरदारीसह.

You might also like