सोनाझी सिन्हानं मुंबईच्या वर्दळीच्या रस्त्यावर चालवली बुलेट, झाली ट्रोल (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच मुंबई स्थित करीना कपूरच्या रेडिओ शो ‘व्हॉट वुमन वॉट’ च्या सेटवर पोहोचली. पण या सेटवर तिचा पोहचण्याचा अंदाज अगदी खास होता. तिने रॉयल इनफील्ड स्वतः चालवून तिथे पोहोचली होती. तिचा बाईक चालविण्याच्या अंदाजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, यासाठी तिला काही लोकांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सोनाक्षी सिन्हाचा बुलेट चालवण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

करीना कपूरच्या रेडिओ शो ‘व्हॉट वुमन वॉट’ च्या सेटवर सोनाक्षी सिन्हाने बुलेट चालवून सर्वांचे लक्ष वेधले. तिचा हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की ती रॉयल एनफिल्ड मुंबईच्या रस्त्यावर चालवित आहे. तिचे फोटो देखील व्हायरल होत आहे. याशिवाय सोनाक्षी सिन्हा दुचाकी चालवत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिच्या बरोबर, एक बॉडीगार्ड देखील रस्त्यावर फिरताना दिसत आहे. हा बॉडीगार्ड सोनाक्षी सिन्हाच्या गाडीपासून इतर वाहने दूर ठेवताना दिसत आहे.

मुंबईच्या रस्त्यावर दुचाकी चालविणाऱ्या सोनाक्षी सिन्हाच्या चाहत्यांना तिची ही स्टाईल खूप आवडली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर सोनाक्षीला ‘दबंग गर्ल’, ‘बुलेट राणी’ अशी नावे दिली आहे. काहींनी तर सोनाक्षी सिन्हाला ‘प्रेरणास्त्रोत’ देखील म्हटले आहे. कौतुकाबरोबरच सोनाक्षीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे.

सोनाक्षीने बरेच सुपरहिट चित्रपट दिले आहे. याव्यतिरिक्त तिला बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागला आहे. या सगळ्यांवर मात करुन तिने चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांच्या मनात वेगळे स्थाने निर्माण केले.