‘या’ फेमस बॉलिवूड अभिनेत्रीचा बेस्ट फ्रेंडसोबतचा फोटो झाला व्हायरल ! तुम्ही ओळखलंत का ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर आपल्या एका लेटेस्ट फोटोमुळं चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. जान्हवीनं तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची खास बात अशी की, यात जान्हवी तिची बेस्ट फ्रेंड आणि कजन शनाया कपूर हिच्यासोबत दिसत आहे. जान्हवीनं तिच्या इंस्टावरून तिचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा एक थ्रोबॅक फोटो आहे ज्यात लहानपणीची जान्हवी कपूर आणि शनाया कपूर दिसत आहे. शनाया जान्हवीची कजन आहे आणि तिची बेस्ट फ्रेंड देखील आहे.

शनाया अनिल कपूरचा भाऊ संजय कपूरची मुलगी आहे. लवकरच ती बॉलिवूड डेब्यू करेल अशी चर्चा आहे. सध्या तिचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे. फोटोत जान्हवी आणि शनाया स्माईल करत आहे. दोघीही खूपच क्युट दिसत आहेत.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती रूही आफ्जा या सिनेमात राजकुमार रावसोबत काम करताना दिसणार आहे. जान्हवी गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलला गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही काम करणार आहे. तिच्यासोबत पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. याशिवाय तिच्याकडे करण जोहरचा मल्टीस्टारर तख्त हा सिनेमादेखील आहे.