आठ ते 14 जून दरम्यानचे सुशांतच्या फोनचे ‘कॉल’ डिटेल्स आले समोर, धक्कादायक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. यादरम्यान, सुशांतचे 8 जून ते 14 जून पर्यंतचे कॉल डिटेल हाती आले आहेत. 8 जून रोजी सुशांतचे रियाशी भांडण झाले. यानंतर या दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर रियाने सुशांतचा नंबर ब्लॉक केला. या कॉल डिटेलनुसार सुशांतने 8 ते 14 जून दरम्यान आपल्या बहिणींशीच चर्चा केली. यावेळी त्याचे रियाशी बोलणे झाले नाही. एवढेच काय सुशांतनेही रियाला मेसेज देखील केला नाही.

या कॉल डिटेल्सवरून हे स्पष्ट झाले की, रिया आणि सुशांतचे 8 ते 14 जून पर्यंत कोणतेही बोलणे झाले नाही. यापूर्वी असे म्हटले जात होते की, सुशांतने शेवटचा फोन रियाला केला होता, पण सुशांतचे रियाशी कोणत्याही प्रकारचे बोलणे झाले नाही, हे कॉल डिटेलवरून स्पष्ट झाले आहे. सुशांत डिप्रेशनमुळे खूप अस्वस्थ झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार सुशांतने 8 जून रोजी आपल्या दोन बहिणी मितू आणि राणीशी संवाद साधला. सुशांतने 8 जून रोजी बहिणींना दोनदा फोन केला. याशिवाय उदय गौरी सिंग यांच्याशीही त्याचे बोलणे झाले. 8 जूननंतर सुशांतने स्वतःहून कोणालाही फोन केला नाही. जे काही फोन होते ते इनकमिंग होते.