Google वर लोकांनी सर्वात जास्त सर्च केलं ‘सुशांत सिंह राजपूत’ ! ‘सुसाईड’नंतर टॉप ट्रेंडमध्ये होतं अभिनेत्याचं नाव

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात एकूण 30 लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा यांचा समावेश आहे. अलीकडेच पोलिसांनी सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी हिची चौकशी केली आहे.

सुशांत गेल्यानंतर लोकांनी त्याच्याबद्दल बरंच काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्याला इंटरनेटवर खूप सर्च केलं. जूनमध्ये सुशांत सिंह राजपूतला सर्वात जास्त सर्च केलं गेलं आहे. खुद्द गुगलनंच याबाबत माहिती दिली आहे. जूनमध्ये सर्वात जास्त सर्च झालेल्यांच्या यादीत सुशांत सिंह राजपूत पहिल्या नंबरवर आहे तर सूर्य ग्रहण दुसऱ्या नंबरवर आहे. तर फादर्स डे तिशऱ्या नंबरवर आहे.

आत्महत्येचं कारण अस्पष्टच
आतापर्यंत सुशांतचा पोर्ट मॉर्टेम रिपोर्ट आणि विसेरा रिपोर्टमधूनही हीच माहिती समोर आली आहे की, त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. परंतु त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं आहे याचा मात्र सुगावा अद्याप पोलिसांना लागलेला नाही. बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like