तापसी पन्नूच्या सिनेमाला लगावली ‘थप्पड’, रिलीज होताच केला ऑनलाईन ‘लीक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तापसी पन्नू,पावेल गुलाटी, दिया मिर्झा, मानव कौल, कुमुद मिश्रा आणि रत्ना पाठक शाह स्टारर थप्पड सिनेमा शुक्रवारी(दि 28 फेब्रुवारी) रिलीज झाला. घरगुती हिंसेनं पीडित महिलांवर आधारीत हा सिनेमा आहे. तापसी पन्नूनं या सिनेमात एका गृहिणीच भूमिका साकारली होती. रिलीजच्या एका दिवसानंतर लगेचच सिनेमा लीक झाला आहे. याचा परिणाम सिनेमाच्या कमाईवर होण्याची शक्यता आहे.

तमिळ रॉकर्स या वेबसाईटनं हा सिनेमा ऑनलाईन लीक केल्याचं समजत आहे. हा सिनेमा आता एचडी प्रिंटमध्ये फ्रीमध्ये डानऊनलोड केला जाताना दिसत आहे. सिनेमाच्या लीक झाल्यानं निर्मात्यांची चिंता वाढल्याचं दिसत आहे. कारण याचा सिनेमाच्या कमाईवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. थप्पड सिनेमाचं बजेट 22 कोटी आहे. या सिनेमाला भारतात 2300 हून अधिक ओव्हरसीजमध्ये 400 स्क्रिन्स मिळाल्या आहेत.

तमिळ रॉकर्सनं सिनेमा ऑनलईन लीक करण्याची ही का ही पहिलीच वेळ नाही. या वेबसाईटनं याआधीही अनेक सिनेमे ऑनलाईन लीक केले आहेत. अलीकडेच रिलीज झालेला विकी कौशलाचा भूत सिनेमाही ऑनलाईन लीक झाला होता. इतकेच नाही तर अजय देगवणचा तान्हाजी : द अनसंग वॉरियर हा सिनेमाही ऑनलाईन लीक करण्यात आला होता.

याआधीही या वेबसाईटनं दबंग 3, पती पत्नी और वो, मरजावाँ, ड्रीमगर्ल, भारत, कबीर सिंह, केसरी असे अनेक मोठे सिनेमे पहिल्याच दिवशी ऑनलाईन लीक केले आहेत. यामुळे सिनेमांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता विकीच्या थप्पड सिनेमावरही याचा परिणाम होण्याचा अंदाज आहे.

You might also like