Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : नट्टू काकाची शेवटची इच्छा करेल तुम्हाला ‘भावनिक’, ‘या’ पध्दतीनं मरण्याची Wish

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   फेमस टीव्ही सिरीयल ‘तारक मेहता का उलटा चष्मा ‘ टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे बंद झालेलं शूटिंग आता सुरू झालं आहे. पण, या कार्यक्रमातील एक व्यक्ति अशी आहे की,जी शूटिंग सुरू झाल्यानंतर इच्छा असूनही सेटवर येऊ शकले नव्हते. मात्र त्यांच्यासाठी आता हा मार्ग खुला झाला आहे. नटू काका असे या पात्राचे नाव असून घनश्याम नायक ही भूमिका साकारत आहेत.

प्रत्यक्षात शुटिंगचे काम सुरू होताना महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचनाही जारी केली होती, ज्यांची काळजी शुटिंग दरम्यान घेतली जाणार होती. यात एक नियम होता की, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक शूटिंग आणि शूटिंगच्या कामात भाग घेऊ शकत नाहीत. यानंतर अनेक स्टार्स शूटिंगमध्ये भाग घेऊ शकले नाहीत आणि त्यात नट्टू काका म्हणजे घनश्याम नायक यांचे नाव होते. दरम्यान, आता मुंबई उच्च न्यायालयाने हा नियम काढून टाकला आहे, त्यानंतर 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोकदेखील शूटिंगमध्ये भाग घेऊ शकतात. हायकोर्टाच्या या निर्णया नंतर घनश्याम नायक खूप आनंदित आहेत आणि ते या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना भावनिक देखील दिसले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते खूप आनंदित आहे आणि हा निर्णय त्याच्यासाठी नवीन जन्मासारखा आहे. आता, ते समाधानी आहे कारण त्वरित नाही तर ते एक किंवा दोन महिन्यात शूटिंगमध्ये भाग घेऊ शकतील.

यासोबतच बर्‍याच टीव्ही शो आणि बॉलिवूड चित्रपटात भाग घेणाऱ्या या अभिनेत्याने आपल्या या शेवटच्या इच्छेविषयीही सांगितले, जी त्यांच्या या शोसह संबंधित आहे. त्यांनी म्हंटले कि, ‘मी सर्व आवश्यक खबरदारी घेईन आणि मी काम करण्यास तयार आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करण्याची इच्छा बाळगतो. जोपर्यंत मी जिवंत आहे आणि जोपर्यंत मी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे तोपर्यंत मला काम करायचे आहे. माझी शेवटची इच्छा आहे की, मला मेकअप घालून मरन यावे. ‘

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like