बॉलिवूडमधील ‘ही’ ‘बोल्ड अँड ग्लॅमरस’ अ‍ॅक्ट्रेस तब्बल 2 वर्षे होती ‘बेरोजगार’, राहण्यासाठी घरही नव्हतं !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : टीव्ही रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 9 ची स्पर्धक आणि मॉडेल मंदाना करीमी आपल्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मंदानाचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच मंदानाचा सेमी न्यूड फोटो समोर आला जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसला. मंदानानं नुकतेच काही खुलासे केले आहेत ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. एक काळ असा होता जेव्हा कामं नव्हतं आणि ती बेघर होती असं तिनं सांगितलं आहे.

https://www.instagram.com/p/CBQUEAnAreO/

एका मुलाखतीत बोलताना मंदाना म्हणाली, “रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस आणि क्या कूल है हम 3 या सिनेमानंतर मला दोन वर्ष कोणतीच ऑफर मिळाली नाही. मी जिवंत राहण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये राहणं खूप कठिण आहे. खूप महाग शहर आहे. अचानक मी बेघर झाले होते. सर्वकाही कठिण झालं होतं. काही दिवस मी कुटुंब आणि दोस्तांवर अवलंबून होते.

https://www.instagram.com/p/CBPgK0upxPG/

इंडस्ट्रीतील वापसीबद्दल बोलताना मंदाना म्हणाली, “वापसी करण्याआधी माझ्याकडे काही अनुभव होते जे वाईट होते. त्यामुळं मी इंडस्ट्रीपासून दूर पळत होते. परंतु जेव्हा इंडस्ट्री तुम्हाला परत घेत याचा अर्थ आहे की, मी हेच करणार आहे.”

https://www.instagram.com/p/CBOMnBvA9ef/

मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बिग बॉस 9 व्यतिरीक्त मंदाना क्या कूल है हम, मेन, चार्ल्स, भाग जॉनी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे. लवकरच(12 जून 2020) ती आता द कसीनो या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. Zee 5 वरही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजमधून मंदाना अ‍ॅक्टींगमध्ये वापसी करत आहे.

https://www.instagram.com/p/CBAN2glJbNl/

https://www.instagram.com/p/B6kN7hoJgTe/

https://www.instagram.com/p/B-ym1VGJrfs/

https://www.instagram.com/p/B-mrMySpC3w/

https://www.instagram.com/p/B-kcTwdJrUE/

https://www.instagram.com/p/B8frEPOp2JP/

https://www.instagram.com/p/B7WHmGipISJ/

https://www.instagram.com/p/B7N7pkrppe5/

https://www.instagram.com/p/B7AiTCkJ5I3/