Coolie No. 1 : ‘या’ दिवशी रिलीज होणार ट्रेलर, समोर आलं नवं पोस्टर ! जाणून घ्या कधी अन् कुठं प्रदर्शित होणार सिनेमा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या त्यांचा आगामी सिनेमा कुली नंबर 1 (Coolie No. 1) मुळं चर्चेत आहेत. हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. आज वरुणनं त्याच्या इंस्टावरून याचं एक पोस्टर शेअर केलं आहे. त्यानं ट्रेलरची माहिती देताना सांगितलं आहे की, 28 नोव्हेंबर रोजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

वरुणनं शेअर केलं नवं पोस्टर

वरुणनं त्याच्या इंस्टावरून एक पोस्टर शेअर केलं आहे. यात तो 5 वेगळ्या अवतारात दिसत आहे. त्यांच्या सोबत सारा अली खानसुद्धा दिसत आहे. सिनेमाचं नवं पोस्ट शेअर करत त्यानं ट्रेलरबद्दल माहिती दिली आहे. कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं आहे की, राजू येतोय. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि फेसबुक व यूट्यूबवर भेटूयात.

कुली नंबर 1 सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर आणि गोविंदा यांच्या कुली नंबर 1 या सिनेमाचा हा रिमेक आहे. डेविड धवननं या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. रिमेकमध्ये सारा आणि वरुण सोबतच परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लिवर, राजपाल यादव सहित इतर कलाकार दिसणार आहेत. वासू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी याची निर्मिती केली आहे.