TV अभिनेत्रीचा बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टरवर रेपचा आरोप ! FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एका टीव्ही अ‍ॅक्ट्रेसनं(Actress) बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टरवर बलात्काराचा आरोप केला आहे. वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या अ‍ॅक्ट्रेसनं(Actress) कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारी (Ayush Tiwari) वर रेपचा आरोप केला आहे. अभिनेत्रीनं दिलेल्या जबाबाच्या आधारे वर्सोवा पोलीस ठाण्यात आयुष तिवारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीमधील कलम 376 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वर्सोवा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यानुसार, अ‍ॅक्ट्रेसनं तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, कास्टिंग डायरेक्टरनं तिला लग्नाचं आमिष दाखवून 2 वर्षांपासून रेप करत आला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर आता इंडस्ट्रीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. असं सांगितलं जात आहे की, ही अ‍ॅक्ट्रेस डायरेक्टर सोबत एका वेब सीरिजमध्ये काम करत होती.

अभिनेत्रीनं 26 नाेव्हेंबर रोजी मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अद्याप आरोपीला अटक केलेली नाही. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तपासानंतर सर्व प्रकरण सविस्तर समोर येईल. अद्याप तरी इंडस्ट्रीतून यावर काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

You might also like