‘कोरोना वॉरियर्स’ला समर्पित ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’ मधील ‘देस मेरे देस’ गाण्याचं नवीन व्हर्जन रिलीज ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अजय देवगण याच्या द लीजेंड ऑफ भगत सिंह सिनेमातील देस मेरे या गाण्याचं स्पेशल व्हार्जन सध्या सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं म्हणजे सध्याच्या कोरोनाच्या संकटात पुढे येऊन लढत असलेल्या कोरोना वॉरियर्ससाठी ट्रिब्युट आहे. अजय देवगण आणि द लीजेंड ऑफ भगत सिंहच्या टीमनं या क्लासिक गाण्याचं नवीन व्हर्जन रिलीज केलं आहे.

हे गाणं खास करून कोरोना संकटात भारतीयांना आणि कोरोना वॉरियर्सला समर्पित केलं आहे. देस मेरे देस मेरे असं गाण्याचं नाव आहे. द लीजेंड ऑफ भगत सिंह हा सिनेमा 2002 साली रिलीज झाला होता. हे गाणं लोकांच्या मनात देशभक्ती जागवताना दिसत आहे. पुन्हा एकदा लोकांना कोरोनाशी लढण्याचं अपील करण्यासाठी हे गाणं रिलीज केलं गेलं आहे.

हे गाणं भारतानं आतापर्यंत केलेल्या कामांवर प्रकाश टाकण्याचं काम करतं. हे गाणं सिद्ध करत आहे की, भारतानं अद्याप अनेक अडचणी दूर केल्या आहेत. या गाण्यातून लोकांना विश्वास दिला जात आहे की, भारत या महामारीलाही दूर करेल.

हे गाणं शेअर करताना अजय देगवणनं म्हटलं आहे की, मला माहित आहे की, देश कठिण काळातून जात आहे. अजय म्हणतो आपणही हे लक्षात ठेवायला हवं की, आपण कोण आहोत आणि कुठे आहोत. आपण एका महान देशाचे नागरिक आहोत. आपला देश या महामारीसोबत तर लढत आहेच. सोबत इतर देशांनाही सहकार्य करत आहे.

अजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो मैदान सिनेमात दिसणार आहे. यात त्याने भारतीय फुटबॉल टीमचे कोच राहिलेले सैय्यद अब्दुल रहीम यांचा रोल साकारला आहे. याशिवाय तो भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमातही दिसणार आहे. अभिषेक दुधैयानं याचं डायरेक्शन केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like