अहमदनगर : बॉम्बस्फोटात दोन जागीच ठार ; लष्कराच्या युद्ध सरावानजीक गावातील घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान मैदानावर पडलेला बॉम्ब निकामी झाल्याचे समजून दोन जण तो घरी घेऊन गेले. त्यामधील शिसे काढत असताना जिवंत बॉम्बचा स्फोट होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. नगर तालुक्यातील खारे कर्जुने शिवारात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अक्षय नवनाथ गायकवाड (वय 19), संदीप भाऊसाहेब धिरोडे (वय 32 दोघे रा. खारेकर्जुने, ता. नगर) ही मयताची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, नगर तालुक्यातील खारेकर्जुने गावालगत भारतीय लष्कराचे के. के. रेंज हा युद्ध प्रात्यक्षिकाचा परिसर आहे. लष्कराच्या सरावादरम्यान वापरून निकामी झालेले बॉम्ब शेजारच्या गावातील काही लोक घेऊन जातात व भंगारात विकतात. अनेक वर्षांपासून हा उद्योग चालतो. काल सायंकाळी असाच एक बॉम्ब अक्षय गायकवाड व संदीप धिरोडे हे दोघे निकामी झाल्याचे समजून घरी घेऊन आले. घरी गेल्यानंतर दोघेही त्या बॉम्बचे शिसे वेगळे करण्यारसाठी फोडू लागले. परंतु हा निकामी नव्हे, तर जिवंत होता. बॉम्ब फोडत असतानाच जिवंत बॉम्बचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात अक्षय गायकवाड व संदीप धिरोडे हे दोघे जागीच मयत झाले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यांच्या शरीराचा अक्षरक्ष: चिखल झाला होता.

याप्रकरणी पहाटेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साळवे यांच्या माहितीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक दाताळे हे करीत आहेत.

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

You might also like