×
Homeताज्या बातम्याBombay High Court | हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले - 'शरद पवारांचीच...

Bombay High Court | हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले; म्हणाले – ‘शरद पवारांचीच प्रतिष्ठा तुम्ही कमी करताय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह ट्विटमुळे निखिल भामरे (Nikhil Bhamre) या विद्यार्थ्याला अटक (Arrest) केली होती. जवळपास महिनाभर अटकेत असलेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्य सरकारला (State Government) खडे बोल सुनावले. शरद पवार यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान (Highest Civil Honor) पद्मविभूषणने (Padma Vibhushan) गौरविण्यात आले आहे. परंतु, तुमच्या कृतीने पवारांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल. एका विद्यार्थ्याला अशा प्रकारे तुरुंगात डांबणे हे पवारांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वालाही आवडणार नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सरकारला फटकारले. (Mumbai High Court)

 

‘त्या’ ट्विटमध्ये कोणाच्याही नावाचा स्पष्ट उल्लेख नाही. असे असताना एक तरुण विद्यार्थी एक महिन्यापासून गजाआड आहे. हे बरोबर नाही. असे करुन तुम्ही देशात दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचीच (शरद पवार) एकप्रकारे प्रतिष्ठा कमी करत आहात, अशा शब्दांत मुंबई हाय कोर्टाने (Bombay High Court) सोमवारी पोलिसांना चपराक लगावली. त्याचवेळी आरोपी विद्यार्थ्याची तात्काळ जामिनावर सुटका करण्यास हरकत नसल्याचे निवेदन राज्य सरकारकडून न्यायालयात झाले, तरच राज्याची प्रतिष्ठाही कायम राहील, असे मत नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आज (मंगळवार) दुपारी सरकार व पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे तोंडी निर्देश दिले.

काय आहे प्रकरण ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट पोस्ट केल्याबद्दल फार्मसीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असलेला निखिल (वय – 22) याच्याविरोधात 13 मे रोजी पहिला एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला होता. यानंतर अनेकांच्या तक्रारींवरुन त्याच्याविरोधात आणखी पाच पोलीस ठाण्यात  एफआयआर दाखल झाले. 14 मे रोजी अटक झाल्यानंतर निखिलला कनिष्ठ कोर्टाकडून जामीन मिळू शकला नव्हता. त्यामुळे त्याने सर्व एफआयआरच्या वैधतेलाच आव्हान देणारी फौजदारी रिट याचिका अ‍ॅड. सुभाष झा (Adv. Subhash Jha) यांच्यामार्फत केली आहे.

 

ट्विटमध्ये नावाचा उल्लेखच नाही
ज्या एका ट्विटच्या आधारावर तब्बल सहा एफआयआर दाखल झाले ते झा यांनी निदर्शनास आणल्यानंतर न्यायमूर्ती संभाजी शिंदे (Justice Sambhaji Shinde) व न्यायमूर्ती मिलिंद जाधव (Justice Milind Jadhav) यांच्या खंडपीठाने तीव्र आश्चर्य व्यक्त केले.
या ट्विटमध्ये तर कोणाच्याही नावाचा स्पष्ट उल्लेखच नाही.
तरीही तरुण विद्यार्थी एक महिन्यापासून गजाआड आहे. तुम्ही (पोलीस) अशाप्रकारे कारवाई करायला लागलात,
तर नाहक देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचीच प्रतिष्ठा कमी होईल, असे खंडपीठाने (Bench) नमूद केले.
तेव्हा पवार यांचे नाव तर सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतही (Presidential Election) चर्चेत आहे,
असे झा यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले.

सरकारी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कदाचित पोलिसांकडून काय सुरु आहे याची कल्पना नसावी.
दररोज हजारो ट्विट होत असतात. अनावश्यक बदनामी करणाऱ्यांबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे बरोबर आहे.
परंतु अशा प्रकारे नव्हे. आरोपी तरुणाची पार्श्वभूमीही योग्य नाही. हे तपासात समोर आले आहे.
हवे तर पोलीस तपासातील तपशील न्यायालयाने पहावे, असा बचाव सरकारी वकिलांकडून करण्यात आला.

 

नेमके ट्विट काय ?
‘वेळ आली आहे, बारामतीच्या गांधीसाठी… बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची…’ असे ट्विट निखिल भामरेने केले होते.
त्यानंतर ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात (Naupada Police Station) राष्ट्रवादीचे आनंद परांजपे (Anand Paranjape) यांच्या तक्रारीवरुन पहिला एफआयआर दाखल झाला.
‘या ट्विटमध्ये आमचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांना बारामतीचा गांधी संबोधून त्यांना संपवण्याच्या आशयाची धमकी दिली आहे’, असे परांजपे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

 

Web Title :- Bombay High Court | mumbai bombay high court slams state govt and police over action taken against offensive tweet on ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Must Read
Related News