क्रिस गेलने केवळ षटकार आणि चौकारांनी टी20 क्रिकेटमध्ये बनवल्या 10,000 धावा, केला नया वर्ल्ड ‘रिकॉर्ड’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – क्रिस गेलला टी20 क्रिकेटचा बॉस उगाचच म्हटले जात नाही, त्याने यासाठी कठोर मेहनत केली आहे आणि त्याचे आकडेही ते सिद्ध करतात की, क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये गेलसारखा कुणीही नाही. 41 वर्षांचा क्रिस गेल जगभरातील टी20 लीगमध्ये खेळतो आणि यावेही यूएईमध्ये आयपीएलच्या 13व्या सीझनमध्येकिंग्स इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करत आहे. टी20 क्रिकेटमध्ये गेलने आता एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन केला आहे, ज्याबाबत विचार केला तरी आश्चर्य वाटते आणि सिद्धही होते की, तो किती खतरनाक फलंदाज आहे, सोबतच तो एक चांगला एंटरटेनर सुद्धा आहे.

क्रिस गेल टी20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनला होता, परंतु आता त्याच्या धावांची एकुण संख्या 13,349 पर्यंत पोहचली आहे. पण, आता त्याने एक नवी कमाल केली आहे. ती म्हणजे त्याने केवळ षटकार आणि चौकारांच्या आधारेच आपल्या धावांची संख्या 10,000 वर पोहचवली आहे. म्हणजे गेल जगातील पहिला असा फलंदाज बनला आहे, ज्याने केवळ षटकार आणि चौकारांच्या बळावर टी20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या आहेत.

आतापर्यंत बोलायचे तर क्रिस गेलने एकुण 405 टी20 मॅच आपल्या क्रिकेट करियरमध्ये खेळल्या आहेत. यामध्ये त्याने एकुण 983 षटकार आणि 1027 चौकार लगावले आहेत. म्हणजे केवळ षटकार मारून त्याने 5,898 केल्या आहेत, आणि चौकांरांनी त्याच्या धावा 4,108 आहेत. हे दोन्ही एकत्र केल्यानंतर धावा संख्या 10,006 होते. म्हणजे आतापर्यंत 13,349 पैकी त्याने 10,006 धावा केवळ षटकार आणि चौकारांनी बनवल्या आहे आणि बाकीच्या 3343 धावा त्याने अन्य माध्यमातून जसे की, सिंगल, डबल किंवा तीन धावांद्वारे बनवल्या आहेत.

केवळ षटकार आणि चौकारांनी टी20 किकेटमध्ये 10,000 पेक्षा जास्त धावा बनवणे सोपे काम नाही आणि हा आश्चर्यकारक रेकॉर्ड आहे, जो क्रिस गेलने केला आहे. टी20 क्रिकेटमध्ये क्रिस गेलची आतापर्यंत सर्वात मोठी खेळी नाबाद 175 धावांची आहे आणि त्याच्या नावावर 22 शतक आणि 83 अर्धशतकं आहेत. क्रिस गेल शिवाय टी20 क्रिकेटमध्ये दहा हजार धावा बनवणारे दोन अन्य फलंदाज पाकिस्तानचा शोएब मलिक आणि वेस्टइंडीजचा किरोन पोलार्ड आहे.