डोंगरावर उभा राहून मारायला गेला बॅक फ्लिप अन् पुढं झालं ‘असं’ काही

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सोशल मीडियावर कायम स्टंटचे व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. असाच एक थरकाप उडवणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा डोंगराच्या अगदी टोकाशी उभा राहून बॅक फ्लिप मारताना दिसत आहे. मुळातच बॅक फ्लिप मारणे सोपे काम नाही.

त्यात या पठ्ठ्या डोंगराच्या अगदी टोकाशी उभा राहून हा खतरनाक स्टंट करत आहे.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या मुलाचे कौतुक नाही तर त्यावर टीका केली जात आहे. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनीही या मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मुलांना केलेल्या स्टंटची प्रशंसा करावी की त्याला मूर्ख म्हणावे असे लिहिले आहे.

हा व्हिडीओ गेल्या वर्षी टीकटॉवर शेअर करण्यात आला होता. मात्र सध्या हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहता येईल की ती व्यक्ती डोंगराच्या टोकावर उभा राहिलेला आहे. अगदी टोकावर उभा राहून बॅक फ्लिप मारली. हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये शूट करण्यात आला आहे. त्याने हा स्टंट यशस्वीरित्या पूर्ण केला खरा. मात्र लोकांनी त्याने घेतलेल्या रिस्कवर टीका केली आहे.