Coronavirus : अतिशहाणपणा आला अंगलट ! ’कोरोना चॅलेंज’ केलं ‘व्हायरल’ आता आला ‘गोत्यात’

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसमुळे अनेकांना जीवाची चिंता आहे. असे असतानाही अनेक लोकांनी चेष्टा मस्करी म्हणून कोरोना चॅलेंज स्वीकारले आहे. कोरोना व्हायरस हा विनोदाचा भाग नाही हे लोकांना कळून चुकले आहे. मात्र असे असले तरी सोशल मीडियावर आणि टिकटॉकवर कोरोनाबाबत अनेक व्हिडीओ शेअर केले जात आहेत. एवढेच नाही तर कोरोना चॅलेंजही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. जगभरातील अनेक लोकांनी चेष्टा मस्करी म्हणून हे चॅलेंज स्वीकारले. मात्र आता हेच चॅलेंज एकाच्या अंगलट आले आहे.

काही दिवसांपूर्वी तरुणाने कोरोना चॅलेंज म्हणून टॉयलेट सीट चाटल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता हाच तरूण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाची थट्टा करणार्‍या या तरूणाला कोरोनानेच धडा शिकवला असे मत काही युझरने व्यक्त केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील लोक एकत्र येऊन उपाययोजना करत असताना ही अशी मंडळी सोशल मीडियावर चॅलेंज करून स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकत आहेत. जगभरात आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, 21 हजार लोकांना मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्‍या जगात लॉक डाऊन करण्यात आले आहे. मात्र घरात बसून लोक आता असे चॅलेंज सुरू करत आहेत. अनेक टिकटॉक स्टार या चॅलेंजमध्ये सहभागी होत आहेत. मात्र हे किती धोकादायक आहे, याचा प्रत्यय सर्वांना आला आहे.