‘लव्हर’शी वाद झाल्याने तरुणानं पोलीस ठाण्याच्या समोर कापली हाताची ‘नस’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेयसीसोबत वादावादी झाल्यानंतर दोघेही तक्रार देण्यासाठी म्हणून निघाले. पोलीस ठाण्याच्या बाहेरच असताना पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. त्यावेळी प्रियकराने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हि घटना गुरुवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यासमोर घडली.

मिळालेल्या माहितीवरुन प्रेयसी आणि प्रियकराची भांडणं झाली. या भांडणातून तक्रार करणार असल्याचे सांगत हिंजवडी पोलीस ठाण्याकडे आले. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाण्यापुर्वी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावरच पुन्हा दोघांमध्ये वादावाद होत भांडण झाले. यावेळी प्रियकराने स्वतःजवळ असलेल्या धारदार वस्तूने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. यावेळी प्रेयसीने आरडा ओरडा केला.

पोलीस ठाण्यासमोर असणारे नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांना विचारले असता कोणीही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले नाही. त्या तरुणाने रस्त्यावरच स्वतःच्या हाताची नस कापून घेतली आहे. सध्या तो रुग्णालयात असून आम्ही नक्की काय प्रकार आहे याची माहिती घेत असल्याचे सांगितले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like