ब्रेकिंग : रामविलास पासवान यांच्या खात्याचा अतिरिक्त पदभार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे काल (गुरूवारी) रात्री निधन झाले. पासवान यांच्याकडे असलेल्या ग्राहकमंत्री, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार आता रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

रामविलास पासवान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 3 ऑक्टोबर रोजी त्यांच्या ह्दयावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं. त्यांच्यावर उपचार चालू होते. दरम्यान, गुरूवारी रात्री पासवान यांचा मुलगा चिराग यांनी वडिल रामविलास पासवान यांचं निधन झाल्याचं ट्विट करून सांगितलं. आता पासवान यांच्या खात्याचा अतिरिक्त पदभार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.