Coronavirus : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना ‘कोरोना’ची ‘लागण’, PM मोदी म्हणाले – ‘तुम्ही योध्दा आहात’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन देखील शुक्रवारी कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. शुक्रवारी त्यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. यानंतर, जॉनसन कोरोना संक्रमित झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पीएम मोदींनी ट्विटरवर लिहिले, ‘प्रिय पंतप्रधान बोरिस जॉनसन, तुम्ही योद्धा आहात. आपण लवकरच या आव्हानावर मात कराल. मी तुम्हाला निरोगी ब्रिटनच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.’

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी शुक्रवारी सांगितले की, हलक्या लक्षणांनंतर त्यांची कोरोना विषाणूची चाचणी सकारात्मक आली आहे आणि आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 10 डाऊनिंग स्ट्रीटमध्ये स्वत: ला अलग केले आहे.त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले की, या प्राणघातक विषाणूविरूद्ध सरकारच्या संघर्षात आपण ब्रिटीश सरकारचे नेतृत्व करत राहू. कोरोनाने देशात 578 लोकांचा बळी घेतला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हंटले की, “गेल्या 24 तासात मला सौम्य लक्षणे दिसली आहेत आणि चाचणी पॉझिटिव्ह आहे.” जॉनसनने पुढे म्हंटले कि, ‘आता मी स्वत: ला वेगळे करत आहे. परंतु ज्या वेळी आम्ही कोरोनाविरूद्ध लढा देत आहोत, त्यावेळी मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारचे नेतृत्व करत राहीन.

डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितले की, गुरुवारी सौम्य लक्षणे उद्भवल्यानंतर इंग्लंडचे मुख्य चिकित्सक प्रोफेसर क्रिस व्हीटीच्या सल्ल्यानुसार पंतप्रधानांवर कोरोना विषाणूची तपासणी करण्यात आली. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या कर्मचार्‍यांनी जॉनसन यांची तपासणी केली आणि त्याचा परिणाम सकारात्मक आला आहे. प्रवक्त्याने सांगितले, ‘सल्ल्यानुसार पंतप्रधान डाऊनिंग स्ट्रीटमध्ये स्वतंत्रपणे राहत आहेत. कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात ते सरकारचे नेतृत्व करत राहतील.