BSNL चा 96 रुपयांचा ‘प्लॅन’ आला परत, मिळणार 90 दिवसाची ‘वैधता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीएसएनएल ने 96 रुपयांचा प्लॅन पुन्हा सुरु केला आहे. मात्र यावेळी या प्लॅनचा कालावधी कमी करण्यात आलेला आहे. या 96 रुपयांच्या प्लॅनला वसंतमन गोल्ड प्लॅन किंवा PV 96 म्हणून ओळखले जाते. या प्लॅनला गेल्या वर्षीच सुरु करण्यात आले होते. मात्र त्यावेळी प्रमोशन म्हणून केवळ 90 दिवसांसाठी हा प्लॅन सुरु करण्यात आलेली होती. आता पुन्हा एकदा कंपनीने या प्लॅनला सुरु केले आहे.

व्हॅलिडिटी केली अर्धी
96 रुपयांच्या या प्लॅनमध्ये या आधी 180 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात असे. परंतु आता या प्लॅनमध्ये केवळ 90 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाणार आहे. म्हणजेच कंपनीने आता व्हॅलिडिटी अर्धी केली आहे.मात्र यामध्ये मिळणाऱ्या फायद्याची व्हॅलिडिटी बदलण्यात आलेली नाही, ती पाहिल्याप्रमाणे 21 दिवसांचीच असेल.

या प्लॅनमध्ये कॉलिंगसाठी रोज 250 मिनिट्स दिले जात आहेत. कॉलिंग व्यतिरिक्त 21 दिवसांसाठी रोज 100 एसएमएस देखील दिले जातात. मात्र यामध्ये प्रकारचा इंटरनेट डेटा दिला जाणार नाही.

बीएसएनएलने हा प्लॅन देखील केला आहे लॉंच
या व्यतिरिक्त अलीकडे बीएसएनएलने 299 आणि 491 रुपयांच्या ब्रॉडबँड योजना देखील सुरू केल्या आहेत. 299 रुपयांच्या योजनेत बीएसएनएल लँडलाईन सेवेद्वारे अमर्यादित व्हॉईस कॉलिंग देण्यात येणार असून 50GB पर्यंत 20Mbps स्पीडने डेटा दिला जाणार आहे. आणि त्यानंतर डेटाची गती 1 एमबीपीएस पर्यंत कमी होईल. यासाठी FUP मर्यादा नाही. ही योजना घेणार्‍या ग्राहकांचे 6 महिन्यांनंतर 2 जीबी CUL योजनेमध्ये माइग्रेट केले जाईल.

बीएसएनएलच्या 491 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील ग्राहकाला भारतातील कोणत्याही नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला 20Mbps च्या स्पीडने 120GB (FUP) डेटा दिला जाणार आहे. मात्र यानंतर डेटाचे स्पीड एक एमबीपीएस इतके होणार आहे. कंपनी तीन महिन्यानंतर ग्राहकाला ब्रॉडबँडमध्ये माइग्रेट करेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like