‘हा’ पक्ष राज्यातील पूर्ण 48 जागा लढवणार ; काँग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांची मोठी गोची

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन वंचित आघाडी आणि इतर काही पक्षांनी त्यांचे लोकसभेसाठीचे उमेदवार जाहिर केले आहेत. लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच आता बहुजन समाज पक्षाने (बसप) राज्यातील सर्व म्हणजेच 48 जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला असून दि. 20 मार्चला ‘बसप’ त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर करणार आहे. ‘बसप’ स्वबळावर लढणार असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ झाली आहे.

समाजवादी पक्ष सोडता इतर कोणत्याही राज्यात काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी अलिकडेच सांगितले होते. त्यामुळे ‘बसप’ स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. ‘बसप’ राज्यातील सर्वच्या सर्व 48 लोकसभेच्या जागा लढविणार आहे. ‘बसप’ची विचारधारा मानणार्‍या उमेदवाराला तिकीट देण्यात येणार आहे. दि. 20 मार्च रोजी जाहिर होणार्‍या ‘बसप’च्या पहिल्या यादीत 8 ते 10 उमेदवारांचा समावेश असणार असल्याची माहिती बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी दिली आहे. ‘बसप’ राज्यातील सर्व जागा स्वबळावर लढविणार असल्याने इतर पक्षांची मोठी गोची झाली आहे.

पवारांनंतर राजीव सातव यांची लोकसभेच्या रिंगणातून माघार 
#Loksabha : तुल्यबळ उमेदवाराच्या शोधासाठी रोहित पवार नगरमध्ये दाखल
राजू शेट्टी यांनी हातकणंगलेचे वाटोळे केले