Builder Amit Lunkad Arrested | बिल्डर अमित लुंकड प्रकरणाचा तपास पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे; फसवणूकीचा आकडा 50 कोटीपर्यंत

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांना अटक (Builder Amit Lunkad Arrested) झाल्यानंतर पुणे पोलिसांकडे (Pune Police) बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) याच्याविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. आजपर्यंत तबल 35 तक्रारी आल्या असून, फसवणूक आकडा 50 कोटींच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पुण्याच्या गुन्हे शाखेकडून (Pune Crime Branch) आर्थिक गुन्हे शाखेकडे (economic offences wing pune) गेला आहे. Builder Amit Lunkad Arrested | Builder Amit Lunkad case transfered to Pune Economic Crimes Branch; Fraud figure up to Rs 50 crore

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

येरवडा पोलीस ठाण्यात (yerwada police station) संजय होनराव (वय 48) Sanjay Honrao यांनी दिलेल्या तक्रारीवरून लुंकड रियालिटी Lunkad Realty फर्मचे अमित लुंकड (Amit Lunkad) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. त्यांना या गुन्ह्यात लागलीच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे senior police inspector balaji pandhare, उपनिरीक्षक झंझाड, चव्हाण व पथकाने अटक केली. या अटकेनंतर शहरात बांधकाम व्यवसायिकामध्ये एकच खळबळ उडाली होती. अमित लुंकडला अटक (Builder Amit Lunkad Arrested) झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फसवणूक (Cheating) झालेल्या व्यक्तींनी पोलिसांकडे धाव घेण्यास सुरुवात केली. प्रथम 4 तक्रारी आल्यानंतर आणखी तक्रारी येत असल्याने खंडणी विरोधी पथकाने पुढील प्रकरण गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (economic offences wing pune) दिले. त्यानंतर आता या विभागाकडे तबल आतापर्यंत 35 तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार जवळपास 50 कोटींहून अधिक फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. या तक्रारीवर आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अमित लुंकड यांना अटक (Builder Amit Lunkad Arrested) केल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी (मंगळवार) न्यायालयात (Pune Court)हजर केले. त्यावेळी न्यायालयाने अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांना न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली. येरवडा कारागृहात yerwada jail रवानगी झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली. लुंकडमार्फत न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येत होता. मात्र न्यायालयाने अर्ज पुन्हा सादर करा, असे आदेश दिले. त्यानंतर दुपारपर्यंत जमिनीचा अर्ज न्यायालयात दाखल झाला नसल्याचे समजते.

25 लाखाचे फसवणूक प्रकरण
लुंकड यांच्या फर्मचे कल्याणीनगर भागात ऑफिस आहे. फिर्यादी संजय हे येथे अमित लुंकड यांना भेटले. यावेळी अमित यांनी त्यांना गुंतवणूक केल्यास 15 टक्के परतावा देऊ असे आमिष दाखविले. फिर्यादीचा विश्वास संपादन केला. लुंकड रिऍलिटी (lunkad realty) बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये वेळोवेळी एकूण 25 लाख रुपये गुंतविले. पण, त्यातील काही रक्कम परत दिली. मात्र त्यानंतर फिर्यादी यांची 21 लाख 26 हजार 875 रुपये न देता तसेच परतावा न देता त्याची फसवणूक केल्याने फिर्यादी संजय यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्याची चौकशी करत गुन्हा दाखल करून तात्काळ अमित लुंकड याला अटक (Builder Amit Lunkad Arrested) केली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title :-  Builder Amit Lunkad Arrested | Builder Amit Lunkad case transfered to Pune Economic Crimes Branch; Fraud figure up to Rs 50 crore

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

Career in photography । फोटोग्राफीची आवड आहे? तर मग करिअर? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजपच्या रडारवर? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव