क्राईम स्टोरीपुणे

पुण्यात बिल्डरची हॉटेलमध्ये आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यामध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजेश माणिकराव सोनवणे (वय-39 रा. सोमवार पेठ) असे आत्महत्या करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचे नावे असून त्यांनी कल्याणीनगर येथील एका हॉटेलमध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे गुरुवारी रात्री कल्याणीनगरमधील एका हॉटेलमध्ये आले होते. त्याठिकाणी त्यांनी एक खोली भाड्याने घेतली होती. शुक्रवारी दुपारपर्यंत खोलीचा दरवाजा बंद असल्याने आणि आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने हॉटेल प्रशासनाने याची माहिती येरवडा पोलिसांना दिली. येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोलीचा दरवाजा उघडला असता सोनवणे बेडवर झोपलेल्या अवस्थेत दिसून आले.

सोनवणे यांच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली या तपास येरवडा पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या

Back to top button