चोरीच्या पैशातून ‘समाजकार्य’ करणारा ‘रॉबिनहूड’ पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – चोरीच्या पैशातून समाजकार्य़ करण्याचा सीन ‘रॉबिनहूड’ या चित्रपटात चित्रीत करण्यात आला आहे. चोरी करून मिळालेल्या पैशातून समाज कार्य़करणाऱ्या टीपीकल ‘रॉबिनहूड’ला औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या या ‘रॉबिनहूड’वर सव्वाशे पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून पोलीस त्याच्या शोधामध्ये होते. चोरीचे पाप धुण्यासाठी चोरीच्याच पैशातून शिर्डी संस्थानला रुग्णवाहीका भेट देण्याच्या प्रयत्नात असताना हा ‘रॉबिनहूड’ पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

किशोर वायाळ असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. चोरी करून समाजकार्य करण्याचा आव आणणाऱ्या किशोरने वैजापूरच्या घरातून ७२ तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ७२ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. किशोरला अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

कामाला ठेवले होते ‘चोर’
किशोर हा मुळचा बुलढाणा जिल्ह्यातील मेरा गावचा रहिवाशी आहे. त्याचे मेरा गावात अलिशान घर असून त्याच्याकडे तीन अलिशान गाड्या आहेत. किशोरचे परराज्यात देखील जाळे असून चोरी करण्यासाठी तो त्या ठिकाणच्या सराईत गुन्हेगाराला हाताशी धरून गुन्हा करत होता. या कामासाठी तो साथिदाराला दिवसाला एक हजार रुपये देऊन चोरीच्या पैशातून बक्षीस देत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरीच्या कामासाठी त्याने चोर कामाला ठेवलेच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

चोरीची पद्धत
किशोर हा चोरी दिवसा करत होता. त्यासाठी त्याने दुपारीची वेळ निवडायचा. चोरी करण्याअगोदर तो साथिदारांकडून घरामध्ये कोणी नाही याची माहिती घेत होता. त्यानंतर त्या घरामध्ये चोरी करत होता. चोरी केल्यानंतर चोरीचे पाप धुण्यासाठी तो चोरीच्या पैशातून समाजकार्य़ करत होता.

गावासाठी मोठे कार्य़
चोरी केल्यानंतर चोरीचा माल विकून तो गावातमध्ये येत होता. त्याने गावातील लोकांसाठी अनेक उपक्रम राबवले. यासाठी त्याने चोरीच्या पैशांचा वापर केला. लोकांना मदत करणे, गावासाठी पाण्याच्या टँकरची सोय करून दिली होती. तसेच त्याने गावातील शाळेसाठी मदत केली होती. त्याने ‘मामा’ नावाची संस्था स्थापन केल्याचे तपासात समोर आले आहे.

चोरीच्या पैशातून ‘दानधर्म’
चोरी केल्यानंतर मुद्देमालाची विक्री करून आलेल्या पैशाच्या १० टक्के पैसे तो समाजीकार्य़ासाठी आणि दानधर्म करण्यासाठी वापरत होता. त्याने गावामध्ये सामुहीक विवाह लावले होते. वैजापूर येथील घरातून ७२ तोळे सोने चोरल्यानंतर त्याने हे पाप धुवून काढण्यासाठी शिर्डी संस्थानला रुग्णवाहिका दान करणार होता. मात्र, हे पाप त्याल धुता आले नाही आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्यावर औरंगाबाद शहराबाहेर १२३ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याचा कसून शोध घेऊन गजाआड केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like