दुबईच्या ‘बुर्ज खलिफा’वर कोसळली ‘वीज’, 7 वर्षांपासून वाट पहात होता ‘हा’ व्यक्ती (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुबईत अलीकडेच वादळासह जोरदार पाऊसही पडला. ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. परंतु अशताच एक घटना घडली ज्याची एक फोटोग्राफर गेल्या 7 वर्षांपासून वाट पहात होता. हा नजारा होता बुर्ज खलिफावर वीज कोसळण्याचा. एकाने कॅमेऱ्यात हे दृश्य कॅप्चर करण्यासाठी वाळवंटातील एका कॅम्पमध्ये पूर्ण रात्र काढली. कारण त्याला परफेक्ट शॉट हवा होता. असं म्हणतात सब्र का फल मिठा होता है. अखेर त्याला हवा तसा फोटो मिळाला.

या फोटोग्राफरचं नाव आहे जोहेब अंजुम. जोहेबने शुक्रवारी रात्री आलेल्या वादळादरम्यान जगातील सर्वात उंच इमारतीवर वीज कोसळतानाचा फोटो काढला आहे. रात्रभर पावसात जोहेब वाळवंटाळातील एका कॅम्पमध्ये होता.

फोटोच नाही तर जोहेबने या दृश्याचा व्हिडीओदेखील काढला आहे. हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर जोहेब म्हणतो, “माझ्यासाठी तो क्षण खूप किंमती होता जेव्हा 2720 फूट उंच बुर्ज खलिफाच्या सर्वात उंच भागावर वीज कोसळली.

जोहेब अंजुमचा हा फोटो बुर्ज खलिफाच्या प्रशासनाने आणि दुबईचे राजकुमार शेख हमदान यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. जोहेब सांगतो जेव्हा वीज कोसळली तेव्हा पूर्ण आकाश निळ्या रंगात रंगलं होतं.

https://www.instagram.com/p/B0kukisJGh5/

दुबईतील मीडियानुसार, 1996 नंतर दुबईसहित संयुक्त अरब अमीरात सहित अनेक भागात पाऊस झाला आहे. हे वादळ इतकं भयानक होतं की, अजूनही हवामान विभागातील लोकांचा अंदाज आहे की, पुढेही असाच पाऊस पडू शकतो.

फेसबुक पेज लाईक करा –