मुंबई आग्रा महामार्गावर द बर्निंग ट्रक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई-आग्रा महामार्गावर पनवेलहुन इंदौरकडे जाणारा गॅसच्या टॅंकरने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवत महामार्गलगतच ट्रक उभा करत तो ट्रकमधून बाहेर पडला. त्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले. परंतु महामार्गावर दुतर्फा मोठी वाहतुक कोंडी झाली होती. त्यानतंर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग आटोक्यात आणली.

मुंबई आग्रा महामार्गावरून गॅसचा टॅंकर (MH 46 BF 7657) पुरमेपाडा गावाजवळ येताच अचानक मागील बाजूस धूर येऊ लागला. त्यामुळे चालक अनिल यादव याने प्रसंगावधान राखत महामार्गाचे जवळच गँस टँकर उभा केला. मात्र टॅंकरने चांगलाच पेट घेतला. त्यामुळे महामार्गावरील दुतर्फा वाहतुक ठप्प झाली.

ग्रामस्थांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यावेळी अग्निशमन कर्मचारी अमोल सोनवणे ह्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर वाहतुक कोंडीतुन वाट काढत मनपा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. आग लागलेल्या टँकरवर पाणी मारा करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. वाहतुक कोंडी झाल्याने पोलीसांची चांगलीच धांदल उडाली.