फायद्याची गोष्ट ! रोज 100 रुपये बचत करून बनवा 20 लाखाचा ‘फंड’ , इथं पैसे गुंतवल्यावर मिळेल जास्तीचा ‘नफा’
नवी दिल्ली : कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डगमगली आहे. ज्यामुळे बँकांनी एफडी आणि सेव्हिंग अकाऊंट वर मिळणार्या व्याजात खुप कपात केली आहे. कमी व्याज मिळत असल्याने बँकांच्या बचत योजना आकर्षक राहिलेल्या नाहीत. अशावेळी जर तुम्हाला कमी पैशात जास्त नफा मिळवायचा असेल तर म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.
जर तुम्ही योग्य योजनेत रोज काही रक्कम वाचवून गुंतवणूक केलीत तर एका कालावधीनंतर तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. तुम्ही रोज 100 रुपये वाचवून 20 लाख रुपयांचा फंड करू शकता. रोज 100 रुपयांची बचत केल्याने तुमच्यावर जास्त आर्थिक बोजाही पडणार नाही. जाणून घेवूयात 100 रुपये रोज वाचवून कसे मिळवू शकता 20 लाख रूपये?
असा होईल 20 लाखांचा फंड
जर तुम्ही रोज 100 रूपयांची बचत करता तर ते महिन्याला 3000 रूपये होतात. तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये चांगल्या म्युचुअल फंड स्कीममध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजे सीपद्वारे गुंतवणूक करावी लागेल. ही गुंतवणूक तुम्हाला 15 वर्षांपर्यंत करावी लागेल. बाजारात असे अनेक म्युचूअल फंड आहेत, ज्यांनी मागच्या मागच्या 15 वर्षात 15 टक्के वार्षिक दराने रिटर्न दिला. जर इतका रिटर्न मिळत राहिल्यास 15 वर्षानंतर तुमच्याकडे 20 लाख रुपयांचा फंड तयार होईल.
इतका होईल फायदा
जर तुम्ही म्युचूअल फंड स्कीममध्ये 15 वर्ष गुंतवणूक केली तर एकुण गुंतवणूक 5.40 लाख रुपये होते. तर तुमच्या एसआयपीची एकुण व्हॅल्यू 20 रुपये होईल. म्हणजे तुम्हाला 14.60 लाख रुपयांचा फायदा होईल.
या फंडने दिले आहे 15% पर्यंत रिटर्न
म्युचूअल फंड रिटर्न बाबत बोलायचे तर काही चांगल्या स्कीम्सने 15 वर्षात 15 टक्केपर्यंत रिटर्न दिला आहे. एसबीआय फोकस्ड इक्विट फंडमध्ये 15.78 टक्के, एलएंडटी मिडकॅप फंडमध्ये 14.83 टक्के, फ्रँकलिन इंडिया प्राइमा फंडात 14.66 टक्के रिटर्न मिळाला आहे.
सीपद्वारे करा गुंतवणूक
सीप, म्युचूअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची चांगली पद्धत आहे. यामाध्यमातून गुंतवणुकीची चांगली अॅव्हरेजिंग होते, ज्यामुळे गुंतवणूकीतील धोका कमी होतो आणि चांगल्या रिटर्नची शक्यता वाढते. म्युचुअल फंडमध्ये सीप सुरू केल्यानंतर जरूरी नाहीं की तुम्ही ठरलेल्या कालावधी पर्यंतच गुंतवणूक करावी. ही गुंतवणूक तुम्ही पाहिजे तेव्हा थांबवू शकता. असे केल्यास कोणतीही पेनल्टी लागत नाही.