CAA च्या विरुद्ध ‘हिंसा’ कारणाऱ्यांकडून रेल्वे ‘वसूल’ करणार 88 कोटी, आतापर्यंत 21 अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वे प्रशासनाने सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्या आणि रेल्वे संपत्तीचे नुकसान करणाऱ्या अनेकांना पश्चिम बंगाल,बिहार आणि आसाम मधून एकूण 21 लोकांना अटक केली आहे. या आरोपींकडून रेल्वे प्रशासन 88 कोटींची वसुली करणार आहे.

रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी 27 तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यातच रेल्वे सुरक्षा दलाकडून हिंसा,रेल्वे संपत्तीचे नुकसान केल्याबद्दल 54 तक्रारी दाखल केल्या आहेत.

आरपीएफ नुसार, व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून इतर आरोपींची ओळख पटवणे सुरु आहे. लवकरच याबाबत आणखी काही जणांना अटक देखील होऊ शकते. रेल्वे नियमानुसार कलम 151 नुसार रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात येणार आहे. यांच्यानुसार जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंत देखील शिक्षा होऊ शकते. दंड वसुलीसाठी रेल्वे प्रशासन न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकते.

पश्चिम बंगालमध्ये जास्त झाले होते नुकसान
CAA विरोधात आंदोलन करताना पश्चिम बंगाल येथील रेल्वे प्रशासनाचे मोठे नुकसान झालेले होते.
संकरेल्वे येथील स्टेशनवरील तिकीट काउंटर जाळण्यात आले होते. सुजनीपारा येथील रेल्वे स्थानक तोडण्यात आले होते. कृष्णपुरा रेल्वे स्थानकांवर अनेक रेल्वे गाडयांना आग लावण्यात आली होती.
मालदा येथील हरिश्चंद्रपूर स्टेशन देखील तोडण्यात आले होते. आसाममध्ये देखील अनेक रेल्वे गाड्या रद्द करायला लागल्याने मोठे नुकसान झाले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/