केवळ पूजेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही कापूर आहे उपयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पूजेसाठी कापराचा सर्वाधिक उपयोग होतो. पण आरोग्याच्या दृष्टीनेही कापूर फायदेशीर आहे.

कापराचे आरोग्यदायी उपयोग –
वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की, कापराच्या सुगंधाने जीवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात.

घरात कापूर रोज लावल्याने ऑक्सिजन ९-११% टक्के इतका वाढतो.

सर्दी-पडसे व्हायची लक्षणे असताना एका रूमालात ३-४ कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दी-पडसे होत नाही.

स्नायूंची दुखणी असोत किंवा शरीराला आलेली सूज; कापरामुळे या समस्या दूर होतात.

पायांना भेगा पडल्या असतील तर त्यावर कापराचं तेल लावावं. चेहऱ्यावरचे डाग, मुरमं, पुटकुळ्या दूर करण्यासाठीही कापूर वापरता येईल.

लवकर झोप न येणं ही बऱ्याच जणांची समस्या आहे. कापराच्या तेलाचा सुवास डोक शांत ठेवतो आणि त्यामुळे शांत झोप येण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी कापराच्या तेलाचे काही थेंब उशीवर टाकून ठेवा.

खोबरेल तेलामध्ये कापराचे तेल मिसळा आणि त्या तेलानं पाच मिनिटं मसाज करा. मसाज केल्यानं रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि परिणामी केसांची वाढ होण्यास मदत होते.

असे बनवा कापराचे तेल –
कापराचं तेल अधिक लाभदायी ठरतं. हे तेल बनवण्यासाठी कापराची पूड करून घ्या. एका भांड्यात थोडं खोबरेल तेल घेऊन त्यात पूड घाला आणि मिश्रण थोडं गरम करा.