एक्सप्रेस हायवेवर कारचा भीषण अपघात, दुभाजकाला धडकून दोघांचा मृत्यु

खोपोली : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे -मुंबई एक्सप्रेस हायवेवर भरधाव जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला असून त्यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यु झाला आहे. अन्य दोघांची प्रकृती गंभीर आहे.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने ही कार जात होती. बोरघाटात रात्री साडेअकरा वाजता कारचालकाचे नियंत्रण सुटले.

त्यामुळे कारने दुभाजकाला धडक देऊन दोन रस्त्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून खोल खड्ड्यात पडली. या घटनेची माहिती मिळताच देवदूत व महामार्ग पोलीस घटनास्थळी रवाना झाले. मात्र, रात्रीचा अंधार, दाट धुके आणि थंडी यामुळे मदत कार्यात अडथळा येत होता. कारमधील लोकांना बाहेर काढण्यात पहाटे यश आले. त्यात दोघांचा जागीच मृत्यु झाला होता.

अन्य दोघांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. रात्रीची वेळ असल्याने नेमका अपघात कसा झाला, याची कल्पना कोणालाच आली नाही. कारमधील जखमीची स्थिती गंभीर असल्याने अधिक माहिती मिळविणे पोलिसांना अवघड जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/