सावधान ! टिव्ही पाहत जेवत असाल तर तुम्हाला होऊ शकतो ‘हा’ आजार

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – काही लोक ऑफिसवरुन घरी आल्यानंतर टिव्हीवर बातम्या, मालिका पाहत जेवण करत असतात. असे दृष्य सर्वांच्या घरी पहायला मिळते. त्यांना माहित नाही की ही सवय त्यांच्या शरीराला खुप हानिकारक आहे. जर तुम्ही असे करत असला तर वेळेतच सवय बदला नाहितर गंभीर आजाराल बळी पडाल.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, जे लोक टिव्ही पाहत काहीतरी खात असतात त्यांची पचनक्रिया कमी होऊन ते ‘मेटाबोलिक सिंड्रोम’ चे शिकार होऊ शकतात. यावर खुप रिसर्च होऊन असा शोध लागला की, टिव्ही पाहत जेवण केल्याने ब्लड प्रेशर वाढतो, शुगर वाढते, कोलेस्टेरॉलची समस्या वाढत जाते. एका संशोधनकर्त्याने सांगितले आहे की, टिव्ही पाहत काही खाल्याने आजाराचे प्रमाण जास्त वाढते. कारण त्यावेळी त्या व्यक्तीचे सर्व लक्ष टिव्हीवर असते. टिव्ही पाहत गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ले जाते. या सवयीमुळे शरीरावर वाईट परिणाम होतो.

‘मेटाबोलिक सिंड्रोम’ हे कोणत्या आजाराचे नाव नाही. टिव्ही पाहत खाल्याने शरीरामध्ये एकावेळी खुप आजार होऊ शकतात. ब्लड प्रेशर वाढणे, डायबिटिज होणे, वाढलेला कोलेस्टेरॉल आणि वजन वाढल्याने ‘मेटाबोलिक सिंड्रोम’ याची समस्या समोर येते. अशावेळी जर तुम्ही जेवणाकडे आणि तुमच्या सवयीकडे पाहून सावधान झाले नाही तर या समस्येचे शिकार होऊ शकतात.