रिया चक्रवर्ती विरोधात केस दाखल, सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात खटला दाखल करण्यात आला आहे. मुझफ्फरपूरच्या पहाती येथील रहिवासी कुंदन कुमार यांनी सीजेएम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांनी रिया चक्रवर्तीवर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. दाखल केलेल्या याचिकेवर 24 जून रोजी सुनावणी होणार आहे.

कुंदन कुमार यांचा आरोप आहे की, रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतला आपल्या प्रेमात अडकवले. सुशांतच्या मदतीने तिच्या करिअरला फायदा झाला, जेव्हा तिचे काम पूर्ण झाले तेव्हा तिने सुशांतचे आर्थिक आणि मानसिक शोषण करण्यास सुरुवात केली. रियाच्या वागण्यात बदल झाल्याने सुशांतला धक्का बसला आणि त्यानंतर त्याने मुंबईच्या वांद्रे येथे त्याच्या घरी आत्महत्या केली.

कुंदन पुढे म्हणाले की, सुशांतने रियाशी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. दरम्यान, रियाने सुशांतसोबतचे संबंध संपवले. रिया सुशांतला फोन करून भडकवायची ज्यामुळे डिप्रेशनमध्ये आल्यानंतर त्याने आत्महत्या केली. कुंदन यांनी भादंवि कलम 306 आणि 420 अन्वये खटला दाखल केला आहे. दरम्यान, यापूर्वी स्थानिक वकील सुधीर कुमार यांनी सलमान खान, आदित्य चोपडा, करण जोहर, संजय लीला भन्साळी आणि एकता कपूर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.