फायद्याची गोष्ट ! ‘RuPay’ कार्ड वरील व्यवहारांवर ‘अशा’ पद्धतीनं मिळणार 16000 रुपयांपर्यंत ‘कॅशबॅक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरगुती देय तंत्रज्ञान कंपनी रुपे आपल्या आंतरराष्ट्रीय कार्डधारकांना काही निवडक देशांतील देवाण-घेवाणीवर 40 टक्के कॅशबॅक देणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं(NPCI) गुरुवारी ही माहिती दिली. एनपीसीआयनं आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, “संयुक्त अरब अमीरात, सिंगापूर, श्रीलंका, ब्रिटन, अमेरिका, स्पेन, स्वित्झर्लंड आणि थायलंड या ठिकाणी जाणाऱ्या भारतीयांना रुपे इंटरनॅशनल कार्ड अ‍ॅक्टीव केल्यानंतर प्रतिमहिना 16000 रुपये एवढा कॅशबॅक मिळणार आहे.”

रुपे इंटरनॅशनल कार्ड, जेसीबी, डिस्कव्हर आणि डायनर्स क्लबसहित अनेक कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना रुपे ट्रॅव्हल टेल्स अभियानाअंतर्गत अधिक कॅशबॅक मिळणार आहे.

16000 रुपये कॅशबॅकची संधी
ग्राहक एका महिन्यात चार वेळा रुपे इंटरनॅशनल कार्डचा वापर करत या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. आता ग्राहकांना एका महिन्यात 16000 रुपये कॅशबॅक मिळवण्याची संधी आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/