दिल्ली मेट्रोनं केली चाचपणी सुरू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   शातील दळणवळण आणि व्यवहार हळूहळू सुरू होत असतानाच दिल्ली मेट्रोनेही चाचपणी सुरु केली आहे. लोकांनी मागणी केल्यामुळे आता मेट्रो प्रशासन पडताळणी करत आहे अशी माहिती दिल्लीचे परिवहनमंत्री कैलाश गेहलोत यांनी दिली. ते म्हणाले,’ आमचे जेवढे ट्रॅक आणि रूट्स आहेत त्यांवरून एक-एक ट्रेन आम्ही लॉकडाउनदरम्यान चालवून बघितली कारण सिस्टिम सुरू राहणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या रेल्वे चालल्या नाहीत त्यांची पूर्ण तपासणी करून त्यांना सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. मेट्रो सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनी घ्यायचा आहे.

जर मेट्रो सुरू झाली तर महत्त्वाची स्टेशन्सच सुरू होतील. प्रत्येक स्टेशनवर थर्मल स्क्रिनिंग केलं जाईल. नोटांचा वापर टाळला जाईल. एखाद्या स्टेशनवर गर्दी झाली तर तिथला प्रवेशच बंद केला जाईल. मोजकी स्टेशन चालू असल्याने उर्वरित मनुष्यबळाचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणाने पालन केलं जाईल. कंद्र सरकारच्या निर्णयानंतर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.