मुंबई-मनमाड दरम्यान धावणार विशेष ट्रेन !

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आला आहे. 12 सप्टेंबरपासून पुढील सूचना येईपर्यंत रेल्वे धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

विशेष रेल्वे मुंबईतील सीएसटी रेल्वेस्थानकातून 12 सप्टेंबरपासून दररोज संध्याकीळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुटणार असून, त्याच दिवशी 10 वाजून 50 वाजता मनमाडला पोहचणार आहे. 02110 स्पेशल ट्रेन मनमाड येथून दररोज सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी सुटणार असून, मुंबईतील सीएसटी रेल्वेस्थानकात 10 वाजून 45 मिनिटांनी पोहचणार आहे. दादर, कल्याण, देवळाई, नाशिक रोड, निफाड, लासलगाव या ठिकाणी या रेल्वेला थांबा देण्यात आला आहे. तसेच, या रेल्वेत 17 सेंकड क्लास सिटिंग आणि तीन एसी चेअर कार असतील. तिकीट आरक्षण केव्हापासून केले जाईल याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र, ते लवकरच जाहीर करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.