आता रेल्वेच्या RPF जवानांच्या युनिफॉर्मवर येणार ‘तिसरा डोळा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांचा युनिफॉर्म अधिक आधुनिक व तंत्रज्ञानयुक्त होणार आहे. रात्रीच्या वेळी आरोपींचा माग काढण्यासाठी युनिफॉर्मवर आता कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ड्युटीवर असताना हे कॅमेरे सतत कार्यरत राहणार असल्याने कोणत्याही प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाकडे सबळ पुरावा राहणार आहे.

कॅमेऱ्याचे वैशिष्ट्ये
युनिफॉर्मवर खांद्याजवळ हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे नाइट व्हीजन कॅमेरे असून त्यामुळे रात्रीच्या वेळीही हे काम करणार असून ते सर्व्हरशी कनेक्टेड आहेत.

कॅमेऱ्याचे उपयोग
प्रवासामध्ये काही वेळा प्रवासी आणि टीसीमध्ये नेहंनीच वाद घडत असतात. अशावेळी घटनास्थळी हजर असलेल्या आरपीएफच्या जवानांच्या खांद्यावरील हे कॅमेरे महत्वाची भूमिका बजावतील. या कॅमेऱ्यामध्ये नाइट व्हीजन तंत्रज्ञान असल्यामुळे आरपीएफ जवानांना पेट्रोलिंग करतानाही त्याचा वापर होणार आहे.

ड्युटीवर असताना हे कॅमेरे सतत कार्यरत राहणार असल्याने कोणत्याही प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाकडे सबळ पुरावा राहणार आहे. तसेच हे रेकॉर्ड सर्व्हरशी कनेक्ट करण्यात येणार असल्याने जर पोलिसांच्या रेकॉर्डवरील एखादा आरोपी असेल तर तो लगेच ओळखता येईल. त्यामुळे हे कॅमेरे आरोपींची चौकशी करताना उपयोगी पडतील. या कॅमेऱ्यांची किंमत प्रत्येकी ३० ते ४० हजार असणार असून मध्य रेल्वे सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ४० कॅमेरे खरेदी करणार आहेत.