‘बोल्ट’चा विक्रम मोडणार्‍या कर्नाटकातील ‘या’ धावपटूची क्रीडामंत्र्यांनी घेतली दखल

कर्नाटक : वृत्तसंस्था – सध्या कर्नाटकचा श्रीनिवासन गौडा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून कर्नाटकमध्ये खेळल्या जाणाऱ्या ‘कंबाला’ या स्पर्धेत त्याने बैलांच्या जोडीसह धावत १०० मीचे अंतर केवळ ९.५५ सेकंदात पूर्ण केले आहे. एवढेच नाही तर त्याने उसेन बोल्टचाही विक्रम तोडला आहे.

याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत असून उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी श्रीनिवासनच्या कामगिरीची दाखल घेतली आहे. तसेच त्यांनी क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी त्याच्या कामगिरीची दाखल घ्यावी, असा सल्लाही दिला आहे. महिंद्रा यांनी त्याच्यात ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची क्षमता असल्याचेही म्हटले आहे.

क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटची दखल घेतली असून  ‘साई’ (Sports Authority of India) च्या माध्यमातून श्रीनिवासनला योग्य प्रशिक्षण दिले जाईल,’ अशी खात्री दिली आहे. तसेच श्रीनिवासनचे सोशल मीडियावर युजर्सकडूनही कौतुक होत आहे.