Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये तुम्ही बाहेर अडकलात अन् घरी जायचंय ? ‘या ’10 गोष्टींमधून जाणून घ्या तुम्हाला काय करावं लागेल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना लॉकडाऊनमुळे प्रवासी मजूर, विद्यार्थी आणि पर्यटक यांच्यासह बरेच लोक अजूनही देशाच्या विविध भागात अडकले आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना आपल्या राज्यात परतायचे आहे त्यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. भारत सरकारने राज्य / केंद्रशासित प्रदेशातील अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आंतरराज्य प्रवास सुलभ करण्याचा आदेश जारी केला आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनंतर देशातील वेगवेगळ्या भागात अडकलेल्या मजुर, विद्यार्थी, पर्यटक आणि रूग्ण इत्यादींसाठी आपापल्या घरी जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जर आपण बाहेर अडकले असाल तर घरी कसे पोहोचाल याबद्दल जाऊन घेऊया…

1. गृहमंत्रालयाच्या या मार्गदर्शक सूचनांनुसार, जर आपण घरापासून दूर कुठेतरी अडकले असाल, तर या क्षणी आपण स्वतःहून घरी जाऊ शकत नाही. यासाठी केंद्र सरकारने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना लोकांना येण्या-जाण्यासाठी वाहतुकीची परवानगी दिली आहे.

2. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी नोडल अधिकारी नियुक्त करावे जे की सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करतील. इतकेच नव्हे तर राज्य व केंद्रशासित प्रदेशात पोहोचणाऱ्या लोकांचा तपशीलही ठेवला पाहिजे.

3. अशाप्रकारे घराकडे जाण्यासाठी आपल्या राज्य सरकारने नेमलेले स्थानिक नोडल प्राधिकरण आपल्याला शोधावे लागेल, जिथे घरी जाण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल.

4. अडकलेल्या समूहातील लोकांना एका राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशातून दुसर्‍या राज्यात किंवा केंद्र शासित प्रदेशात जायचे असेल तर पाठवणारे राज्य आणि ज्या राज्यात तो समूह जात असेल त्या दोन्ही राज्यांच्या परस्पर सहमतीद्वारे रस्त्याने त्यांना पाठविले जाऊ शकते.

5. कोणतीही व्यक्ती पाठवण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाईल आणि जर तो पूर्णपणे निरोगी आढळला असेल तरच त्याला पाठविण्यास मान्यता देण्यात यावी. म्हणजेच, जर कोविड -19 या कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या आजाराची कोणतीही लक्षणे नसतील तरच आपणास घरी जाण्याची परवानगी असेल.

6. प्रवासी कामगार, प्रवासी आणि विद्यार्थ्यांना समूहाने फक्त बसद्वारे पाठवले जाईल. पाठविण्यापूर्वी बसची स्वच्छता केली जाईल. एवढेच नाही तर प्रवासाच्या वेळी सामाजिक अंतर देखील पाळले जाईल.

7. मार्गावर पडणारे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश त्या राज्यास रस्ता देतील जेथे ही गाडी जात आहे.

8. आपण आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचल्यास आपणास क्वारंटाइन केले जाईल. आपल्याला होम क्वारंटाइन करण्यात यावे ही स्थानिक आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. यावेळी आपली आरोग्य तपासणी देखील केली जाईल.

9. आपणास आरोग्य सेतु अ‍ॅप वापरावे लागेल, म्हणजेच ते आपल्या मोबाईलमध्ये ठेवावे लागेल जेणेकरून आपल्या आरोग्याच्या स्थितीवर लक्ष ठेवता येईल आणि आपल्याला देखील ट्रॅक करता येईल.

10. प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्यात काही बिघाड झाल्यास तुम्हाला त्याच वेळी रुग्णालयात नेले जाईल. याचा अर्थ असा की आपण पुन्हा घरी जाऊ शकणार नाही.