पक्ष सर्वांचे समाधान करू शकत नाही, महाविकास आघाडीतील ‘या’ मंत्र्यानं सांगितलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर तीनही पक्षातील अनेक आमदारांनी मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी राजीनामे देण्याची तयारी दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचे नेते सर्वांचं समाधान करु शकत नाहीत. तीन पक्ष आहेत त्यामुळे नाराजी होणारच असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्तारास विलंब झाला यावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, मला वाटत नाही की मंत्रिमंडळ विस्तार आमच्यामुळे रखडला असेल. काही खाती लहान आहेत. त्यामुळे काहीजण नाराज आहेत, असेही त्यांनी सांगितले. ते नाशिकमध्ये बोलत होते.

जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढणार
भुजबळ म्हणाले की, मला कोणतंही खातं दिलं तरी चालेल. मला काय मिळणार याची मला कल्पना नाही. कृषीमंत्री पदाबद्दल मी काही ऐकले नाही. ते बातम्यांमधून दिसलं. तसेच महाविकास आघाडी जिल्हा परिषद निवडणूक एकत्रित लढणार असा आदेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तो काँग्रेसचा अंतर्गत विषय
काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी काल पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड केली. यावर छगन भुजबळ यांना विचारले असता, तो काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत जास्त बोलणे टाळले. तसेच आमचे सोळंके हे नाराज होते मात्र आम्ही त्यांची नाराजी दूर केली आणि ते थांबले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. संजय राऊत यांच्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, त्यांनी सांगितले आहे की मी नाराज नाही.

मेट्रोची आवश्यकता असेल तर करा
मुंबईमध्ये लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे तिथे मेट्रोची आवश्यकता आहे. नाशिकमधील मेट्रोला विरोध केलेला नाही. मात्र, नागपूरमध्ये मेट्रोचे काय झाले ते बघावे. मेट्रोची आवश्यकता असेल तर करा. मात्र, अभ्यास करुन निर्णय घ्यावा असेही भूजबळ यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफीवर बोलताना ते म्हणाले, नियमित पैसे भरणाऱ्यांसाठी चांगली योजना सरकार आणेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?