छगन भुजबळ भडकले, म्हणाले – ‘भाटगिरी किती करायची यालाही मर्यादा’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या जयकुमार गोयल यांच्या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करण्यात आली आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर देशभरातून आणि महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे याबाबत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. मोदींची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी करणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. भाटगिरी किती करायची यालाही मर्यादा असतात, अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

यापूर्वी देखील मोदींची तुलना प्रभू रामचंद्र यांच्याशी करण्यात आली होती. शिवाजी महाराज यांच्या नावावर मत मागायची आणि आता तुनला करायची. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले परत घेतले. मोदींनी POK घेतला का ? शिवजी महराजांनी शेतकऱ्यांवर प्रचंड प्रेम केले आणि आता शेतकरी मरत आहेत. या पुस्तकावर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
शिवसेनाही आक्रमक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत झाल्याने शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. शिवसेनेने पुस्तक प्रकाशनाच्या बॅनरला जोडे मारून निषेध केला आहे. तसेच बॅनरवर असलेल्या भाजपच्या नेत्यांवर शाई फेक करत भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
जयकुमार गोयल पुस्तकावर ठाम

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचं प्रकाशन करत वाढ ओढावून घेणारे जयभगवान गोयल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींची शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना करून मी चूक केली नाही. पुस्तक तर आता बाजारात आलेलं आहे. मात्र पक्षाचा आदेश अंतिम असेल जयभगवान गोयल यांनी सांगितले. या पुस्तकावरून संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना जयकुमार गोयल हे आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/