चाकण : मैत्रिणीचे विवस्त्र फोटो फेसबुकच्या बनावट अकाउंटवर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत ओळख झालेल्या मैत्रिणीचे विवस्त्र फोटो फेसबुकच्या बनावट अकाउंटवर अपलोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी २१ वर्षीय तरुणीने चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सुनील बांबू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वर्षीय तरुणी आणि सुनील हे पहिल्यांदा मुंबईमध्ये भेटले होते.

तेथेच त्यांच्यामध्ये मैत्री झाली. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी हे तरुण पिंपरी-चिंचवडमध्ये या तरुणीला भेटण्यासाठी आले. त्यावेळेस सुनीलने फेसबुकवर या तरुणीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवर सुनीलने फिर्यादीचाच फोटो प्रोफाइल फोटो म्हणून वापरला होता. याच अकाऊंटवरुन सुनिलने काही विवस्त्र फोटो अपलोड केले. तसेच मी देहविक्री करते अशी पोस्टही त्याने या अकाऊंटवरुन केली होती.

या सर्व प्रकाराची माहिती मिळताच फिर्यादी तरुणीने चाकण पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (आयटी अ‍ॅक्ट) आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com