पुलवामा हल्याचे पुणे कनेक्शन : चाकणमधून बांग्लादेशी दहशतवाद्याला अटक

पुणे आणि बिहार एटीएसची संयुक्त कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या जवळ असलेल्या चाकण परिसरातून एका बांग्लादेशी दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. पुणे आणि बिहार एटीएसने संयुक्त कारवाई करत या दहशतवाद्याला अटक केली आहे. शरीयत मंडल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आज त्याला पुणे सत्र न्यायाललयात हजर करण्यात येणार आहे. पुणे न्यायालयातून ट्रांझिट रिमांड घेऊन त्याला बिहारला घेऊन जाण्यात येणार आहे. संशयित अतिरेकी चाकण परिसरात लपून बसला होता. एटीएसच्या या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर जवानांच्या तैनातीसंबंधीच्या आदेशाची फोटोकॉपी दोन दहशतवाद्यांजवळ मिळाली होती. त्या दोन दहशतवाद्यांसोबत आज अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याचे संबंध असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याचे बांग्लादेशी अतिरेकी संघटना आईएसबी (इस्लामिक स्टेट बांग्लादेश) या संघटनेशी संबध आहेत.

बिहार एटीएसने बांग्लादेशातील झेनुजा जिल्ह्यातील महेशपुर हद्दीतील चापातल्ला गावातील खैरुल मंडल आणि अबू सुलतान या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याजवळ पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा जवानांच्या तैनातीसंबंधीच्या आदेशाची फोटोकॉपी मिळाली होती. हे दोन्ही दहशदवादी बांग्लादेशातील जमीयत-उल-मुजाहिद्दीन आणि इस्लामिक स्टेट बांग्लादेशी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत. हे दोघेही कोणत्याही कागदपत्राशिवाय भारतात आले आहेत. तसेच आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी बनावट भारतीय मतदान कार्ड बनवले आहे.

अटक करण्यात आलेले दोन्ही जमीयत-उल-मुजाहिद्दीन संघनेच्या आदेशानुसार भारतात आले आहेत. त्यांनी कोलकत्ता, केरळ, दिल्ली आणि बिहारमधील पटना आणि गया शहराची रेकी केल्याचे समोर आले आहे. या शहरातील मुस्लीम मुलांना दहशतवादी संघटनेत सहभागी करुन आणि बौद्ध धार्मीक स्थळावर दहशतवादी हल्ला करण्यासाठी त्यांनी रेकी केली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. बिहार एटीएसने त्यांच्याकडून आयएस‍आय आणि इतर दहशतवादी संघाटनांचे पोस्टर, पत्रके, दोन बनावटी भारतीय मतदान ओळखपत्र, एक बनावट पॅन कार्ड, तीन मोबाईल, एक मेमरी कार्ड जप्त केले आहे.

You might also like