चाणक्य नीति : चुकूनही ‘या’ गोष्टींवर ठेवू नका विश्वास, जीव येवू शकतो धोक्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र ग्रंथात जीवनाच्या मूल्यांसोबत घरगूती जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी आणि धोरणाबद्दल सांगितले आहेत. चाणक्यच्या या धोरणांचे पालन करून लोक अनेक त्रासातून मूक्त होऊ शकतात. चाणक्य यांची धोरणे केवळ यशाच्या मार्गावर नेण्यास उपयुक्त ठरत नाही तर, त्यांचे अनुसरण केल्यास लोकांना व्यावहारिक ज्ञान देखील मिळते. त्याच वेळी, आचार्य चाणक्य यांनी आपल्या ‘चाणक्य नीति’ या ग्रंथात अशा गोष्टींबद्दल वर्णन केले आहे, ज्यावर लोकांनी विश्वास ठेवू नये.

नदीनां शस्त्रपाणीनां नखीनां श्रृंगीणां तथा।
विश्वासो नैव कर्तव्य: स्त्रीषु राजकुलेषु च।

या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, लोकांनी कधीही नद्यांवर विश्वास ठेवू नये. चाणक्य यांनी असे म्हटले आहे कारण नद्यांचा प्रवाह समजणे कठीण आहे. जेव्हा सामान्य वेगाने वाहणारी नदी केव्हा वेग पकडेल, हा अंदाज करणे कठीण आहे.

आचार्य चाणक्य असेही म्हणतात की, शस्त्रे परिधान केलेल्या लोकांवर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे. कारण अशा लोकांवर अवलंबून राहून तुम्ही फक्त आपल्यासाठीच धोक्याची हाक दिली आहे कारण रागाच्या भरात हे लोक कोणावरही हल्ला करु शकतात. म्हणून, आपण या लोकांवर विश्वास ठेवणे टाळावे.

या व्यतिरिक्त, आचार्य चाणक्य म्हणतात की, शिंगे किंवा नखे ​​असलेल्या प्राण्यांवर अवलंबून राहणे धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. असे प्राणी कधीही कोणाचीही हानी करतात म्हणून अशा प्राण्यांवर कधीही विश्वास ठेवू नका. त्याच बरोबर, आचार्य चाणक्य म्हणतात की वाईट स्वभावाच्या स्त्रिया केवळ त्यांचा स्वार्थ दर्शवतात. स्वतःच्या फायद्यासाठी, ती कोणालाही मूर्ख बनवू शकते. त्याच वेळी, आचार्य चाणक्य जे सरकारी सेवेत संबंधित आहेत त्यांच्यावरही विश्वास ठेवण्यास मनाई करतात.