चाणक्य म्हणतात माणसाने अगदी ‘निर्लज्ज’पणे केली पाहिजेत ‘ही’ 3 कामे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चाणक्य हे महान ज्ञानी होते,त्याच प्रमाणे एक उत्तम नीतिकार देखील होते. जीवन सुखकर करण्यासाठी त्यांनी अनेक महत्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. चाणक्यांनी सांगितलेल्या अशा तीन गोष्टींबाबत आपण माहिती घेणार आहोत ज्या करताना आजिबात देखील शरम वाटता काम नये.

1) एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात पैसा खूप महत्वाचा असतो.चाणक्य म्हणतात की कर्जाची मागणी करताना एखाद्याला कधीही लाज वाटू नये. वेळ येताच कर्ज घेतलेले पैसे त्वरित काढून घ्यावेत. ज्या व्यक्तीला पैसे परत घेण्यासाठी वाईट वाटतं, त्याला आयुष्यभर पश्च्याताप होतो.

2) एखाद्या माणसाचे भविष्य उज्ज्वल बनवण्यामागे गुरूचा मोठा हात असतो. चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीने गुरुकडून ज्ञान घेताना कधीही त्याची लाज बाळगू नये. ज्याला गुरूंकडून ज्ञान घेण्यास लाज वाटते. त्या व्यक्तीचे ज्ञान अपूर्ण राहिले. ज्यामुळे त्याला आयुष्यात अपयश येते.

3) चाणक्य म्हणतात, व्यक्तीच्या शरीरासाठी जेवण खूप महत्वाचे आहे त्यामुळे व्यक्तीने जेवण्यासाठी कधीही लाज बाळगू नये. जेवण नेहमी मनमोकळे पणाने करायला हवे. जेवताना लाजणाऱ्या व्यक्तीला नंतर उपाशी रहावे लागते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/