Lockdown मध्ये हजारो नागरिकांचे पोट भरणाऱ्या मनसेच्या सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांचा सन्मान !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाच्या काळाला सामाजिक बांधिलकी जपत एकवेळा पोट भरण्याची भ्रात असणाऱ्या हजारो नागरिकांचे पोट भरणारे मनसेचे सुरक्षा संघटना अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. एकाच वेळी त्यांना तीन पुरस्कार मिळाले आहेत.

चंद्रकांत गायकवाड हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहराचे सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत. देश भरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. देश लॉकडाऊन केल्यानंतर मजूर, गरीब, रोजच काम करून पोट भरणाऱ्याना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. मुख्य म्हणजे जेवणाचा आणि धान्यचा प्रश्न मोठा होता. पण या काळात मदतीचे हजारो हात पुढे आले आणि पुण्यनगरीत उपाशी पोटी कोणी राहिले नाही.
पोलीस प्रशासनापासून सर्व राजकीय पक्ष, संघटना आणि विविध दानशूर व्यक्तीने सामाजिक बांधिलकी जपत अन्यधान्य वाटप केले. तसेच गायकवाड यांनी देखील या काळात हजारो नागरिकाना अन्यधान्य, 15 दिवसांचा किराणाचे वाटप केले आहे. त्यांनी स्वतःच्या संघटनेसोबतच वेगवेगळ्या सामाजिक संघटनामधून ही मदत केली आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तीन सामाजिक संस्थानी पुरस्कार देऊन गौरविले आहे.

यात शहरातील स्वामी फाउंडेशन, स्वरा फाउंडेशन आणि शिवराज्य मुस्लिम फ्रंट यांच्या वतीने आज त्यांना पुरस्कार देण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्थरातून शुभेच्छा देण्यात येत आहे. तर त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले जात आहे.