‘चंपा’ची ‘चंपी’ करणारे उमेदवार आमच्याकडे, राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना ‘मनसे’ टोला ! (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा आज कसबा पेठ येथे पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्या दरम्यान कोल्हापूरचा एक मंत्रीच पुण्यात वाहत आला. मनसेचा उमेदवार या ‘चंपा’ची ‘चंपी’ करणार, अशा शब्दात राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

राज ठाकरे यांनी सभेला सुरुवात होताच, उपस्थितांमधून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून आवाज येत होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी काय असा प्रश्न विचारताच उपस्थितांनी ‘चंपा’ असे म्हटले. त्यानंतर पुणेकर नाव ठेवण्यात लई पटाईत आहेत, असे म्हणत ‘चंपा’ म्हणून चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टीका केली. सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधक कार्यकर्त्यांकडून ज्याप्रमाणे खिल्ली
उडविण्यात येते त्याचप्रमाणे अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेख ‘चंपा’ असा केला होता.

पवार कुटुंबीयातील तरुण भविष्यात भाजपमध्ये येऊ शकतात, आणि आले तर त्यांचे स्वागत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावरून अजित पवारांना एका पत्रकार परिषदेत विचारले होते. त्यावेळी अजित पवार यांनी थेट चंपा असाच उल्लेख चंद्रकांत पाटलांचा केला होता. आता राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा असा करून पुणेकरांना इशारा दिला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी