Chandrakant Patil | ‘खा. सुजय विखेंना चांगला जावई मिळेल’ – चंद्रकांत पाटील

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे एका कार्यक्रमादरम्यान नगर जिल्ह्यात आले होते. त्यावेळी पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ज्येष्ठांची चांगली सेवा करीत असल्याने भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) यांना चांगला जावई मिळेल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. या विधानामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.
खासदार सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) यांच्याकडून केंद्र सरकारची वयोश्री योजना (Vyoshri Yojana) राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ज्येष्ठांना सहाय्यभूत ठरणारी साधने वाटली जात आहेत. त्या केंद्राला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली आहे. त्यावेळे बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, डॉ. विखे पाटील ज्येष्ठांना आधार देणारे हे पुण्याचे काम करीत आहेत. आई-वडिलांसमान असलेल्या या नागरिकांपर्यंत ते केंद्र सरकारची योजना पोहचवत आहेत. त्यांचे नियोजनही कौतुकास्पद आहे. यातून त्यांना नक्की पुण्य मिळेल आणि त्यांना चांगला जावई मिळेल, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जावयांमुळे नेते अडचणीत आल्याचीही काहींच्या बाबतीत चर्चा आहे.
अशा परिस्थितीत पाटील यांनी विखे यांच्या भावी जावयाबद्दल केलेल्या या मिश्किल टिपणीला उपस्थितांच्या हशा पिकल्या.
दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विखे पाटील यांच्यासोबत शिर्डी मतदारसंघातील उपक्रमाची पाहणी केली.
केंद्र सरकारच्या या योजनेत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नारिकांना आरोग्यासाठी उपयुक्त विविध साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
या केंद्रावर नागरिकांशी संवाद साधताना पाटील यांनी विखे पाटलांचे कौतुक केले आहे.
Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil mp sujay vikhe patil
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा ‘पंच’ किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी