Chandrakant Patil | महापुरुषांबाबत कुणीही चुकीची वक्तव्ये करू नयेत; चंद्रकांत पाटलांनी … – दीपक केसरकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या अनुदानावर बोलताना महापुरुषांचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांनी केलेल्या विधानाचा सर्व स्तरांतून निषेध नोंदविण्यात आला. तसेच त्यांच्यावर अजित पवार, अमोल मिटकरी, प्रकाश आंबेडकर, सुषमा अंधारे आदी नेत्यांनी टीका केली. त्यावर आता शिंदे गटाने भाष्य केले आहे. सरकारला महापुरुषांबद्दल अभिमान असून, महापुरुषांबाबत कुणीही चुकीची वक्तव्ये करू नयेत. चुकीचे विधान केल्यास ताबडतोब माफी मागितली पाहिजे, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

 

आमच्या सरकारला महापुरुषांबद्दल अभिमान आहे. महापुरुषांबाबत कुणीही चुकीची वक्तव्ये करू नयेत. कोणी महापुरुषांबद्दल चुकीचे विधान केले असेल, तर ताबडतोब माफी मागितली पाहिजे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याशी मी याबाबत चर्चा करणार आहे. ते निश्चितच याबाबत खुलासा करतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

 

शाळा किंवा महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकारवर अवलंबून का राहता?
महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालये सुरू केली.
त्यावेळी त्यांना सरकारने अनुदान दिले नाही. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या आणि चालविल्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरून राज्यात वादंग उठले आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | minister deepak kesarkars reaction on chandrakant patils controversial statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई