‘रामायण’मध्ये ‘कैकई’चा रोल करणारी फेमस ‘चंद्रकांता’ आज इंडस्ट्रीतून गायब !

पोलिसनामा ऑनलाइन –1994 ,साली दूरदर्शनवर प्रसारीत केली जाणारी मालिका चंद्रकांता पुन्हा टेलीकास्ट केली जावी अशी मागणी होताना दिसत आहे. या फँटसी शोमध्ये शिखा स्वरूपनं लिड रोल साकारला होता ज्याला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं शिखां आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यानंही लोकांना इम्प्रेस केलं होतं. 1998 साली मिस इंडिया राहिलेल्या शिखाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

रामायणमध्ये केला कैकईचा रोल, आज आहे इंडस्ट्रीतून गायब

शिखा स्वरूपनं ऑल इंडिया पिस्टल शुटींग चॅम्पियनशिप (1988)मध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. तिनं भारत आणि परदेशात 400 हून अधिक फॅशन शोज केले आहेत. मल्टीटॅलेंटेड असणाऱ्या शिखानं नॅशनल लेवलवर बॅडमिंटनही खेळलं आहे. तिची हाईट 5 फूट 11 इंच आहे. त्या काळातील ती उंट अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते.

https://www.instagram.com/p/B82v6u0hFeY/

अनेक शो आणि सिनेमात शिखानं काम केलं आहे. तिचा चंद्रकांता शो हिट झाला. 80 आणि 90 च्या दशकातील भारताती मोस्ट डिजायरेबल वुमन म्हणून शिखा ओळखली जायची.

शिखानं 11 सिनेमात लिड अॅक्ट्रेस म्हणून काम केलं आहे. यात तहलका, पुलिसवाला गुंडा, पुलिस पब्लिक, कायदा कानून, चीता, आवाज दे कहा है असे सिनेमे आहेत.

शिखा अंदाज, अमर प्रेम, युग, कहां से कहां तक अशा मालिकेत दिसली आहे. शिखानं कहाणी चंद्रकांता की शोमधून टीव्हीवर कमबॅक केलं होतं.

खूपच कमी लोकांना माहिती आहे की, शिखानं झी टीव्हीवरील रामायण या मालिकेत कैकईचा रोल केला होता. ही मालिका 2012 मध्ये आली होती. मुकेश सिंहनं ही मालिका डायरेक्ट केली होती.

शिखा जेव्हा गंभीररित्या आजारी पडली तेव्हा तिच्या करिअरला ब्रेक लागला. शिखाला याचा खूप मोठा झटका लागला होता. आता अनेक वर्षांपासून ती ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर आहे. ती सोशल मीडियावरही अॅक्टीव नसते.