Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सहकारनगर व कोरेगाव पार्क परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणीवर बलात्कार (Rape In Pune) करुन मानसिक छळवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन जणांवर पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 जून 2022 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सहकारनगर (Sahakar Nagar Police Station) व कोरेगाव पार्क (Koregaon Park Police Station) येथे घडला आहे. (Pune Crime News )

याबाबत पर्वती येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सुशांत सुधीर गयावळ (वय-29), सुधीर गयावळ, सुप्रिया सुधीर गयावळ (सर्व रा. सहकारनगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 376 (2) (एन), 377, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुशांत याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच पीडित तरुणीची इच्छा नसताना जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. आरोपीने पीडित तरुणीच्या असाह्यपणाचा गैरफायदा घेऊन शारीरिक, मानसिक छळवणूक केली. सुशांत याच्याकडून होत असलेल्या शारीरिक छळवणुकीला व गैरकृत्याला त्याच्या आई वडिलांनी पाठिंबा दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | संरक्षण दलातील अधिकाऱ्याची तब्बल 74 लाखांची फसवणूक,
दापोडी मधील घटना

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार